भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉ नीलम गोऱ्हे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. उद्यापासून ९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या अधिवेशनात ते २८८ नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना पदाची शपथ देतील आणि ९ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतील. त्यानंतर राज्यपाल विधिमंडळाला संबोधित करतील.
Site Admin | December 6, 2024 7:41 PM | BJP | Kalidas Kolambakar | Legislative Assembly