डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 30, 2024 1:10 PM

printer

हरियाणा विधानसभा निवडणुक : उमेदवार निश्चितीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक विषयक केंद्रीय समितीची बैठक नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात काल संध्याकाळी झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे हरियाणा निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक झाली. दरम्यान, काल दुपारीसुद्धा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या हरयाणा गाभा समितीची बैठक झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा