प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं असून त्यांनी भाजपा कार्यालयात जाऊन अभिनंदन केलं. भाजपामधे आनंदाचं वातावरण आहे. दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजय साजरा करत आहेत. नागपूरच्या भाजप कार्यालयाबाहेर ढोलताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. कोल्हापूरच्या भाजपाने प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. धुळ्यातही भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
Site Admin | February 8, 2025 7:17 PM | bjp coworkers | celebrate victory in Delhi
दिल्लीतल्या विजयाचा राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष
