हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा खोटारडेपणा उघडा पडला, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. देशात २०२९पर्यंत भाजपाचं सरकार असल्याने आता राज्यालाही डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला कळून चुकलं आहे. असं ते म्हणाले. महाराष्ट्रातही महायुतीला भरघोस मतं मिळतील आणि डबल इंजिन सरकार येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
Site Admin | October 8, 2024 3:54 PM | Chandrasekhar Bawankule | Haryana Assembly elections
हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा खोटारडेपणा उघड – चंद्रशेखर बावनकुळे
