संघटन शक्ती मजबूत करण्याची आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात दिली आहे. या मूलमंत्राचे पालन करुन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले. मुंबईत ते वार्ताहरांना संबोधित करत होते. या दौऱ्यात अमित शहा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं संघटनेत ऊर्जा निर्माण झाली आहे. महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना आता जोमानं काम करेल, असंही त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या मनात महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील, त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देतील, असंही त्यांनी नमूद केलं.
Site Admin | September 26, 2024 3:10 PM | BJP | Chandrasekhar Bawankule
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू – चंद्रशेखर बावनकुळे
