आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवाव्यात याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नसून राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर त्याआधीच्या सरकारने सुरू केलेल्या १५ योजना त्यांनी बंद केल्या, आता महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर ५० ते ६० योजना बंद करण्याचा त्यांचा विचार आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे, राज्यातल्या १४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी महायुतीचं सरकार आणणं गरजेचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्ष शब्दच्छल करत असल्याचा आरोप करत, देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत, असंही ते म्हणाले.
Site Admin | September 6, 2024 7:20 PM | Assembly Elections | BJP
राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
