शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन येत्या युवा दिनी अर्थात १२ जानेवारीला होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थितीत हे प्रदेश अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला १० हजार भाजप पदाधिकारी, तरूण कार्यकर्त्यांच्या उपस्थिती असणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाजपची महाराष्ट्रातील युवकांना साथ आहे. विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळात तरूणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अभियान सुरू करण्यात येणार असल्याचही बावनकुळे म्हणालड. तसंच, मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार सोहळा होणार असल्याचही बावनकुळे म्हणाले.
Site Admin | December 13, 2024 2:49 PM | BJP | Chandrasekhar Bawankule