डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ जुलैला भाजपाचं व्यापक अधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी, 21 तारखेला भाजपाच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांचं व्यापक अधिवेशन पुण्यात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीबद्दल महत्वपूर्ण चर्चा आणि काही निर्णय या अधिवेशनात घेतले जातील अशी माहिती भाजपाच्या पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काल दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील निर्णयांची तसंच राज्यातील महायुतीच्या सरकारने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी राज्यात संवाद यात्रा काढली जाणार आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये माध्यमांना दिली.