नवीन सदस्यनोंदणी अभियानात दीड कोटी प्राथमिक तर ५ लाख सक्रीय सदस्य मिळवण्याचं प्रदेश भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मुंबईत आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. येत्या १० जानेवारीला घर चलो अभियान सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहिल्यानगर इथं येत्या १२ जानेवारीला होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत सुमारे १५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्घाटनसमारंभाला उपस्थित राहणार असून समारोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Site Admin | January 7, 2025 4:50 PM | BJP