डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव-कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश

सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिध्देश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक वर्गीय पक्षी दगावले होते, या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

 

या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचही सूचित करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा