नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात किवळा इथं कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे तिथल्या दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे. किवळा इथं नुकतीच कोंबड्यांमधे मरतूक दिसून आल्यानं पशुसंवर्धन विभागानं मृत कोंबड्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पुण्याच्या पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेत, तसंच भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यांच्या तपासणीत या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे.
Site Admin | January 26, 2025 6:15 PM | bird flu | Nanded