डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विविध क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामंजस्य करार

भारत – बांग्ला देश दरम्यान आज विविध क्षेत्रातले महत्त्वाचे सामंजस्य करार झाले. यात पर्यावरणस्नेही उपक्रम, सागरी व्यापार, रेल्वे दळणवळण, आरोग्य आणि वैद्यक, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांग्ला देशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्याबरोबर आज नवी दिल्लीत हैद्राबाद हाऊस इथं दि्वपक्षीय चर्चा केली. त्यानंतर ह्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. बांग्ला देशी नागरिकांना भारतात वैद्यकीय उपचारांसाठी ई- व्हिसा दिला जाईल, तसंच बांग्ला देशात रंगपूर इथं नवीन सहाय्यक दूतावास सुरु केला जाईल अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली. 

बांग्ला देशाप्रति, शेजारधर्म, पूर्वगामी धोरण, सागरी व्यापार धोरण व्हिजन सागर आणि हिंद- प्रशांत महासागर क्षेत्रातलं धोरण अशा विविध पातळ्यांवर भारताचे दृढ संबंध आहेत, असं प्रधानमंत्री मोदी यांनी या चर्चेनंतर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारत हा बांग्ला देशचा विश्वासू मित्र असल्याची भावना बांग्ला देशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली, तसंच प्रधानमंत्री मोदी यांना बांग्ला देशात येण्याचं निमंत्रण दिलं.  

यानंतर शेख हसीना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा