बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्राच्या बॅटरीच्या मुद्यावरुन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मतदान यंत्रांच्या बॅटरी चार्जिंगबाबत सात मतदार संघांमधल्या २० तक्रारी आयोगाकडे दिल्या असल्याचं काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी बातमीदारांना सांगितलं. या तक्रारींबाबत चौकशी पूर्ण होईपर्यंत ही मतदान यंत्रं सील करावीत अशी विनंती निवडणूक आयोगाला केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | October 9, 2024 8:15 PM | Bihar Assembly Elections | Congress
बिहार विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणुक आयोगाकडे तक्रार
