डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बिहारमध्ये पावसामुळे २८ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये काल अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाल्याच वृत्त आहे. राज्यातील नालंदा , जहानाबाद, मुज्जफरपूर, आरारिया आणि बेगुसराई या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. नालंदा जिल्ह्यात पावसामुळे सर्वात जास्त 18 जणांचा मृत्यू झाला असून, बिहार शरीफ इथ एका मंदिराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले .

 

इस्लामपूर , सिलाओ, राहुई , गरियक इथही वीज अंगावर कोसळून झालेल्या अपघातात काही जण मृत्युमुखी पडले. बिहारच्या पाटणा, नालंदा , खगारिया, जहानाबाद आणि अनेक जिल्ह्यात वादळी वारे वाहून जोरदार वृष्टि झाली. अनेक ठिकाणी पावसामुळे झाडे उन्मळून पडली आणि वीज पुरवठा खंडित झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात पावसामुळे झालेल्या या दुर्घटनांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केल असून,मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे, तसच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा