बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रगती यात्रेदरम्यान, काल त्यांनी कैमूर जिल्ह्यात सुमारे ३४५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या, १६९ विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. कैमूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं काम लवकरच सुरू होईल असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना केलं. या यात्रेदरम्यानच नितीश कुमार यांनी, एका पदवी महाविद्यालयाचं उद्घाटन केलं, तसंच सोन नदी-कोहिरा नदी जोड प्रकल्पाची पाहणी केली.
Site Admin | February 19, 2025 10:07 AM | Bihar
बिहारमध्ये ३४५ कोटींहून अधिक रकमेच्या १६९ विकास प्रकल्पांचं उद्घाटन
