बिहारमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन मध्यवर्ती पथक आज पाटण्यात दाखल होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत हे पथक विविध ठिकाणांची पाहणी करेल तसंच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेईल. गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव पार्थसारथी या सात सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व करणार आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानामुळे बिहार सरकारनं केंद्र सरकारकडे तीन हजार 638 कोटी रुपयांची मदत मागितल्याचं बिहारचे आपत्तीव्यवस्थापन विभागाचे मंत्री संतोषकुमार सुमन यांनी म्हटलं आहे.
Site Admin | October 20, 2024 9:58 AM | Bihar Flood