डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 2, 2024 8:08 PM | Bihar Flood

printer

बिहारमधे आणखी काही भागांना पुराचा तडाखा, पूरग्रस्तांची संख्या १५ लाखावर

बिहारमधे, पुराच्या तडाख्यात आज आणखी काही भाग आल्यानं पूरग्रस्तांची संख्या सुमारे १५ लाख झाली आहे. कोसी, गंडक, महानंदा, कमलाबालन, बागमती, आणि इतर नद्यांची पाणीपातळी वाढली असून, राज्यातल्या इतर सखल भागातही ते पसरलं आहे. सीतमढी, दरभंगा, पश्चिम चंपारण, मधुबनी, सुपौल आणि सहर्सा या भागांना जास्त तडाखा बसला आहे. पूर्णिया, अररिया, मधेपूरा, आणि किशनगंज जिल्ह्यांमधल्या अनेक गावांमधेही पुराचं पाणी शिरलं आहे. 

 

 जलजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पूरग्रस्त भागात बोट ॲम्ब्युलन्स  तैनात केल्या आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलांनी आतापर्यंत अडीच लाख लोकांना पुरग्रस्त भागातून बाहेर काढलं आहे. पुराचा जोर मोठा असल्यानं अनेक रस्ते, वीजपुरवठा वाहिन्या आणि इतर पायाभूत सुविधांना मोठी हानी पोचली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा