बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा करुन ते मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीनं घेतला आहे. महाआघाडीतल्या सहा घटक पक्षांची बैठक आज पाटणा इथं झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव या समितीचे अध्यक्ष असतील. जागावाटप, प्रचारमोहिम, निवडणूक रणनीती यांच्याशी संबधित मुद्यांवर ही समिती निर्णय घेईल. समान किमान कार्यक्रमही ही समिती तयार करेल.
बिहार विधानसभा निवडणुक येत्या ऑक्टोबर -नोव्हेबर महिन्यात होणं अपेक्षित आहे.