अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांनी बिनशर्त मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी, न्यूयॉर्क न्यायालयानं ट्रम्प यांना कोणत्याही शिक्षेशिवाय दोषी ठरवलं आहे.
याचा अर्थ ट्रम्प तुरूंगवास, दंड होणार नाही. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. एखाद्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतरही राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत.