आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांच्या परिणामामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर अंकांची १ हजार ६४ अंकांची घसरण झाली, आणि तो ८० हजार ६८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३३२ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ३३६ अंकांवर बंद झाला. नोव्हेंबरमधल्या भारतीय गुंतवणूक आणि व्यापाराचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर निर्यातीत घट झाली होती. भारतीय रुपयावरचा वाढता दबाव आणि वाढती व्यापार तूट याचा एकत्रित परिणाम गुंतवणूकदारांवर झाल्यामुळे ही घसरण होत असल्याचं शेअर बाजार तज्ञांचं म्हणणं आहे.
Site Admin | December 17, 2024 6:58 PM | #nifty50 #NiftyBank #sensex