भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि महाराणी पेमा वांगचुक यांच आज दोन दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी त्याचं विमानतळावर स्वागत केलं. या दौऱ्यात भूतान नरेंश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून परराट्रमंत्री आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याने भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.