डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 31, 2024 4:06 PM | Bhushan Gagarani | BMC

printer

मुंबईतल्या वायू प्रदुषणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बांधकामं थांबवण्याचे पालिकेचे आदेश

मुंबईतल्या वायू प्रदुषणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भायखळा आणि बोरीवली पूर्व भागातली सर्व बांधकामं थांबवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबईत काल ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. भायखळा आणि बोरीवली पूर्व इथं बांधकांम कंत्राटदार आणि विकासक प्रदूषणासंदर्भातले नियम पाळत नसल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळे या भागातली खासगी आणि सरकारी  बांधकामं हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बंद ठेवली जातील, असं गगराणी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, वरळी आणि नेव्ही नगर इथल्या बांधकामांवर पालिकेकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना न केल्यास इथली बांधकामं देखील बंद केली जातील, असंही गगराणी म्हणाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा