डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १०व्या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित

जागतिक पर्यावरणासमोरच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शाश्वत जीवनशैली महत्वाची असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १० व्या बैठकीला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या सुरुवातीला केनियामध्ये झालेल्या पर्यावरण परिषदेत शाश्वत जीवनशैलीचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यावर अंमलबजावणी केली जावी, असा आग्रह यादव यांनी या बैठकीत केला.

 

भारताने पर्यावरणासमोरची आव्हानं पेलण्यासाठी ठोस पावलं उचलल्याचं  यादव यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन यादव यांनी ब्रिक्स देशांना यावेळी केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा