डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Bhopal Gas Tragedy : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

भोपाळच्या युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड कंपनीत झालेल्या वायू दुर्घटनेतील विषारी कचरा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील पिथमपूर भागात हलवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. 

 

न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंडपीठाने युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड कंपनीतल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत आज होणाऱ्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्यास ही नकार दिला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था-निरी, राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्था-NGRI आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातल्या तज्ज्ञांनी या संदर्भात सविस्तर विचार मांडले आहेत. त्यावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आणि तज्ज्ञांच्या समितीनं विचार करूनच निर्णय दिल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा