डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं आणि विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

मराठी भाषा भवन, सावित्रीदेवी फुले छात्रालयासह अनेक नवीन प्रकल्पांचं आणि विविध विकासकामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केलं. जवाहर बालभवन, सावित्रीबाई फुले छात्रालय यांचे नुतनीकरण तसंच नायगाव शिवडी पोलीस वसाहतींचे नुतनीकरण अशा अनेक विकासकामांचा यात समावेश आहे. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा ही अभिजात आहेच पण आता याला राजमान्यता मिळाली म्हणून मराठीप्रेमींमध्ये दसरा दिवाळीचं वातावरण आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य उद्योगस्नेही असून, सर्वाधिक पायाभूत सुविधा राज्यात आहेत. पायाभूत सुविधा, उद्योग आणि कल्याणकारी प्रकल्प यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी जेष्ठांसाठी करण्यात येणाऱ्या निवारा योजना तसंच महापालिका शाळांमधल्या टेरेस गार्डनचा उल्लेख केला. 

 

त्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत वाशी इथं सायन पनवेल महामार्गावरच्या ठाणे खाडी पूल क्रमांक तीनच्या मुंबई-पुणे या उत्तर वाहिनी मार्गिकेचं लोकार्पण तसंच रेवस-रेडी सागरी महामार्गावरच्या ७ खाडी पुलांच्या कामांचं भूमिपूजन केलं. बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजित कांजूरमार्ग-भांडूप-विक्रोळी इथल्या रुग्णालयाच्या वास्तूचा भूमीपूजन सोहळाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज होत आहे. 

 

या नंतर नांदेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तिकरण मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील यावेळी उपस्थित असतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा