डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाड परिसरात भीमसृष्टी निर्मिती करण्याची घोषणा

महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केली. ते आज महाड इथं चौदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. तर, चौदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषीत झालेल्या ७ कोटी रुपयांची, तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची तीन कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील, अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली. 

 

महाडमध्ये आज चौदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत सकाळपासूनच उत्साहात सुरू झाला. सकाळी साडेआठ वाजता चौदार तळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली. यावेळी हेलिकॉप्टर मधून चौदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा