आज भाऊबीज, दिवाळीचा शेवटचा दिवस. भावाबहिणीच्या गोड नात्याला समर्पित असलेला हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात, भाई फोटा, भाई टीका, यमद्वितीया अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणामुळे भावाबहिणींमधलं प्रेम अधिक घट्ट होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावरून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेम, समर्पणभाव आणि भक्तिभावाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात भरभरून आनंद घेऊन येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | November 3, 2024 12:20 PM