प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आसामच्या लोकांना भाषा गौरव सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आसाममध्ये भाषा गौरव सप्ताह येत्या ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची समाजमाध्यमावरील पोस्ट शेअर करताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आसामच्या लोकांचा उत्साह अधोरेखित करण्यासाठी हा सप्ताह एक उल्लेखनीय प्रयत्न आहे. सप्ताह साजरा करण्याच्या उपक्रमांनी राज्यातले लोक आणि आसामी संस्कृती यांच्यातले संबंध अधिक दृढ केले पाहिजेत, आसामबाहेरच्या आसामी लोकांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
Site Admin | November 4, 2024 3:10 PM | Bhasha Gaurav Saptah | PM Narendra Modi