भारतनेट प्रकल्पाअंतर्गत सरकारनं आत्तापर्यंत देशभरातल्या दोन लाख १४ हजार ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी दिली असल्याचं, दळणवळण राज्यमंत्री डॉ. पेमासानी चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. भारतनेट प्रकल्पांतर्गत आदिवासी भागांसह सरकार सर्व ग्रामपंचायती आणि गावांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी देऊ करेल, असं ते म्हणाले. सरकारनं सुधारित भारतनेट कार्यक्रमाला मंजुरी दिली असून उर्वरित तीन लाख ८० हजार ग्रामपंचायतविहीन गावांना मागणीनुसार एक लाख ३९ हजार कोटी रुपये खर्चून कनेक्टिव्हीटी देण्यात येईल, असंही चंद्रशेखर यांनी लेखी उत्तरात नमूद केलं आहे.
Site Admin | December 4, 2024 8:03 PM | Bharatnet Project