एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं तसंच तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस उपलब्ध करून देणं या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येईल, असं प्रतिपादन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज केलं. भंडारा आणि नाशिक इथं झालेल्या एसटी अपघाताबरोबरच नुकत्याच घडलेल्या बेस्ट बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चालकांचं प्रशिक्षण, निवड चाचणी, मानसिक आरोग्य या बाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 11, 2024 7:40 PM | Bharat Gogawale