राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून भारत ब्रँड चणा डाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सुरू केली.
भारत चणा डाळ ७० रुपये किलो आणि चणा ५८ रुपये किलो दरानं उपलब्ध होईल अशी माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिली. याशिवाय भारत मूग डाळ १०७ रुपये किलो आणि मसूर डाळ ८९ रुपये किलो दराने मिळत आहे.