भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मिती कारखान्यात स्फोट होऊन ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेच्या वेळी कारखान्यात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. स्फोटातल्या जखमींना भंडारा रूग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत बचावकार्य सुरु आहे.
स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या प्रति संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.