छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐतिहासिक पाणचक्की आणि दरवाजांचे चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं काल खासदार भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, पारपत्राची सुविधा शहरातल्या टपाल कार्यालयाद्वारे देण्यात यावी अशी अपेक्षाही कराड यांनी व्यक्त केली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशभरातल्या टपाल कार्यालयात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यालयाला ई – सायकल प्राप्त झाल्या आहेत, विभागाचे दोन कर्मचारी “डाक सेवा जनसेवा” या संकल्पनेद्वारे या सायकलवर विविध शहरांमध्ये प्रवास करून मुंबईला पोहोचणार आहेत. या ई – सायकल रॅली ला कराड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.