बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांच उद्दीष्ट केवळ मुलींना शिक्षित करणं नसून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेणे आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याचा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सुदृढ बाळासाठी, गर्भवतीच्या आरोग्याच्या काळजीपासून ते प्रसुतीपर्यंतच्या आरोग्य सेवेचे महत्त्व तसंच सर्व तपासण्या, लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित केलं.
केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री अन्नपूर्णा देवी यांनीही योजनेचे यश हे सरकार, समाज आणि स्थानिक समुदायांच्या सामूहिक प्रयत्न, योगदानाचा परिणाम असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं. तर केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाल्या की, मुलींविषयीच्या विचारसरणीत आणि वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीची चळवळ झाली आहे