डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची आज दशकपूर्ती

बेटी बचाओ – बेटी पढाओ या अभियानाला आज दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील.

 

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आतापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेत आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो.

 

या अभियानात सर्व वर्ग सहभागी झाले असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाजमाध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. या अभियानामुळे स्त्री आणि पुरुषातील लिंगभावभेद कमी झाला तसंच मुलींच्या शिक्षण आणि करिअरसाठी योग्य वातावरण तयार झालं असं प्रधानमंत्री म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण कमी होतं तिथेही बदल घडला, या अभियानामुळे स्त्री-पुरुष समानतेकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या मुलींच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा