मुंबईत कुर्ला इथं बेस्ट बसच्या अपघातातील मृतांची संख्या सातवर पोहचली आहे. तर, जखमींची संख्या ४९ झाली आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रूग्णालयांमधे दाखल केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातल्या जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, या बसच्या चालकाला न्यायालयानं २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.