बर्लिन चित्रपट महोत्सवात काल जागतिक ऑडिओव्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद – वेव्हज २०२५ साठी एक आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय शिष्टमंडळाने युरोपियन चित्रपट बाजारपेठेत सहभागी झालेल्या जगभरातील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. या सत्रात, भारताच्या प्राचीन वारशाचं आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीचं अनोखं मिश्रण – यावर चर्चा करण्यात आली. बर्लिन चित्रपट महोत्सवाने वेव्हज २०२५ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आघाडीच्या चित्रपट व्यक्तिरेखांना आमंत्रित केलं आहे. या प्रसंगी, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते शेखर कपूर यांनी बर्लिनेलमध्ये भारतीय मनोरंजन उद्योगाच्या अफाट क्षमतेवर प्रेरणादायी भाषण दिलं . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय भारताच्या कानाकोपऱ्यातील निर्मात्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सक्षम करणे आहे. असं त्यांनी सांगितलं .
आंतरराष्ट्रीय उद्योगासाठी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिऍलिटी क्षेत्राशी सहकार्य करण्याची एक उत्तम संधी असल्याचं कपूर यांनी म्हटलं आहे .