अकोला आणि कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून २१ व्या पशुगणनेला सुरुवात झाली. ही गणना २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यात पशुसंवर्धन खात्याचे १३८ तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रगणक ग्रामीण भागात घरोघरी जाऊन पशुंची गणना करणार आहेत. प्रगणकांकडून गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, उंट, घोडा, गाढव, हत्ती, मिथुन अशा विविध पशुप्रजातींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्राण्यांचे वय, लिंग, जात, प्रजाती, मालकी हक्क आदी १५ प्रजातींच्या माहितीबरोबच २१९ स्वदेशी जातींच्या नोंदीही घेतल्या जाणार आहेत.
Site Admin | November 25, 2024 7:16 PM