रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पणनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी, न्यायालय माझ्या बहिणींना न्याय देईल,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
Site Admin | August 2, 2024 7:42 PM | CM Eknath Shinde
रक्षाबंधनाच्या सणापूर्वी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार
