बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी काल पदभार स्वीकारला. मस्साजोग हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रलंबित कामं लवकरच पूर्ण केली जातील, असं कॉवत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोणतीही अडचण असेल तर नागरिकांनी आपल्याला भेटून सांगावी असं आवाहन कॉवत यांनी केलं.
Site Admin | December 22, 2024 3:19 PM | Beed Police