बीड जिल्ह्यात मशिदीत स्फोट घडवल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपीवर यूएपीए कायदा लागू करावा, अशी मागणी माजी खासदार इम्तियाज़ जलील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथे रमजान ईदच्या नमाजानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काल पहाटे गेवराई तालुक्यातल्या अर्ध मसला गावात हा स्फोट झाला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या दोघांवरही यूएपीए लागू करावा अशी मागणी जलील यांनी केली. नागपूर हिंसाचारतल्या आरोपीचं घर पाडण्यात आलं. ही कारवाई याही प्रकरणात करावी, कायदा सर्वांना समान असावा, असंही जलील म्हणाले.
Site Admin | March 31, 2025 3:12 PM | Beed Mosque Blast
मशिदीत स्फोट घडवणाऱ्या आरोपींवर UAPA कायदा लागू करण्याची जलील यांची मागणी
