मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, आंदोलनाच्या निमित्ताने खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया हे सगळे जण जाहीर सभांमध्ये समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करत आहेत. आपल्या विधानांतून ते मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण करत आहेत. त्यामुळे या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बीडमधल्या काही नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आज काही नागरिकांनी एकत्र येत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मागणीचं निवेदन दिलं.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याआधीच सक्तीच्या रजेवर पाठवलेले प्रशांत महाजन यांचाही त्यात समावेश आहे. त्याची बदली नियंत्रण कक्षात केली गेली आहे.