बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर असलेलं कर्ज राज्यशासनाच्या मदतीने कमी करून मार्च २०२५ अखेर ही बँक कर्जमुक्त होईल असं बँकेचे प्रशासक आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटलं आहे. बँकेवर ५८ कोटी रुपयांचं कर्ज असून यासाठी शासनाकडून २८ कोटींची मदत मिळणार असल्याचं पाठक यांनी वार्ताहरांना सांगितलं .
Site Admin | January 7, 2025 7:17 PM | Beed DCC Bank
बीड डीसीसी बँक मार्च अखेर कर्ज मुक्त होणार
