बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एका सरपंचाच्या कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी ग्रामपंचायती अंतर्गत केलेल्या कामांची ९६ लाखांची देयकं प्रशासनाने रोखली. याची दाद मागण्यासाठी सरपंच शशिकला मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या अन्य दोघांनी अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मस्के कुटुंबाला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलं आहे.
Site Admin | August 26, 2024 3:48 PM | beed
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचाच्या कुटुंबाचं आत्मदहनाचा प्रयत्न
