बीड जिल्ह्यात आजपासून २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली आणि नियोजित असलेली विविध आंदोलनं, आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यातही अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी शस्त्रबंदी तसंच जमावबंदी आदेश जारी केले आहेत.