बीड जिल्ह्यातल्या विविध सामाजिक – राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनानं १२ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. मराठा, ओबीसी,धनगर समाजाचे आरक्षणासाठी सुरू असलेली आंदोलनं, मस्साजोग इथल्या सरपंचांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेलं आंदोलन, आणि येऊ घातलेलं नववर्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, तसंच कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनाई आदेश जारी केल्याचं जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.