डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 18, 2025 10:57 AM

printer

बँकांनी लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करावी – रिझर्व बँक

देशभरातील बँकांनी सर्व ग्राहकांच्या मुदत ठेवी आणि लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करावी. असे निर्देश रिझर्व बँकेनं काल दिले. बँकांमधील ठेवींसाठी दावेदार उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठेवीदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांच्या दाव्यांचा जलद निपटारा करण्यासाठी आणि संबंधितांचा त्रास कमी करण्यासाठी नामांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

बँकेतील मंडळानं ग्राहक सेवा समितीच्या माध्यमातून नामांकन नोंदणीचा नियमित आढावा घेण्याच्या सुचना आरबीआयनं दिल्या आहेत. या वर्षी 31 मार्चपासून तिमाही आधारावर आरबीआयच्या दक्ष पोर्टलवर प्रगतीचा अहवाल सादर करावा लागणार. असंही काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा