वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी आपल्या सुलभ आणि किफायतशीर सेवांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं केंद्रीय दूरसंवादमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या सातव्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये या बँकेच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे.
या बँकेत आतापर्यंत ९ कोटी ८८ लाख भारतीयांनी खाती उघडली आहेत. याशिवाय वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना ४५ हजार कोटी रुपयांचे लाभ या खात्यांमधून दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.