न्यायव्यवस्थेत सुधारणा करायच्या मागणीसाठी बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतरांनी केलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी काल राजीनामा दिला. बांगलादेशचे कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज सल्लागार प्राध्यापक आसिफ नजरुल यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली. राजीनामा पत्र कायदा मंत्रालयाकडे पोहोचलं असून, ते विनाविलंब राष्ट्रपतींना पाठवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
काल, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतर जमा झाले आणि त्यांनी सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल असा इशारा दिला होता.