ठाणे जिल्ह्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी तस्करीविरोधी दलाने मिळालेल्या माहितीवरुन ठाणे जिल्ह्यात मनोरपाडा भागातल्या एका पुनर्वासितांच्या चाळीवर मंगळवारी धाड टाकली. या ठिकाणी राहणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना भारतातल्या वास्तव्याची अधिकृत कागदपत्रं दाखवता आली नाहीत तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
Site Admin | January 30, 2025 5:36 PM | Bangladeshi women arrested
ठाण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ४ बांगलादेशी महिलांना अटक
